loader
Breaking News
Breaking News
Foto

रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी श्री. बने यांचे पाचल ग्रामस्थांकडून स्वागत

तुषार पाचलकर (राजापूर ) राजापूर पोलीस ठाणे अंतर्गत रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी श्री.दत्ताराम बाणे यांनी पदभार स्वीकारल्यानिमित्त पाचल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ग्रामस्थांनी त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत, पाचल गाव व परिसरात पोलीस प्रशासनाकडून सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पाचल गावात विविध सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, वाहतूक व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था राखणे, नियमित पोलीस गस्त तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या रायपाटण पोलीस दूरक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत तत्परतेने आणि सक्षमपणे पार पाडत असतात. त्यांच्या या जनाभिमुख सेवेमुळे गावात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, याबद्दल पाचल ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी श्री.बाणे यांना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय यापुढेही अधिक दृढ राहील, असा विश्वास व्यक्त केला. श्री बाणे यांची रत्नागिरी पोलीस दलामध्ये 32 वर्षे सेवा झालेली असून त्यांनी त्यांच्या सर्व्हिस मध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाणे तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, देवरुख पोलीस ठाणे, मंडणगड पोलीस ठाणे याठिकाणी आपले कर्तव्य बजावलेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg