loader
Breaking News
Breaking News
Foto

प्राथमिक आरोग्य केंद्र, कोळवली येथे जन आरोग्य समितीची सभा उत्साहात संपन्न

आबलोली(संदेश कदम)- गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, कोळवली येथे जन आरोग्य समितीची सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेला जि.प.चे कृषी व पशुवर्धन, दुग्ध विकास समिती सभापती तथा जन आरोग्य समिती अध्यक्ष महेश नाटेकर, गुहागरचे उपसभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्या सुचित्रा घाणेकर, तालुका आरोग्य अधिकारी तथा सह अध्यक्ष डॉ. घनश्याम जांगीड, प्रियांका सुर्वे, नितीन गंगावन, गणेश कुलकर्णी, अनंत गावडे, प्रदीप सुर्वे यांच्यासह जन आरोग्य सदस्य डॉ. प्रणाली जाधव तसेच आरोग्य सहाय्यक, कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सभेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध आरोग्यविषयक कामाचा आढावा घेण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी जन आरोग्य समितीची रचना, कार्यक्षेत्र, निधी विनियोग, कर्तव्य आणि जबाबदारी याबद्दल महत्वपूर्ण माहिती देऊन आरोग्य केंद्राबाबत दिल्या जाणार्‍या रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सुविधा व सेवा गुणवत्तेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत आणि कर्मचारी निवासस्थाने गळती आणि दुरुस्ती बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg