loader
Breaking News
Breaking News
Foto

फॅशन क्षेत्रात मंडणगड वडवलीच्या रोशन मोडकले यांची दमदार कामगिरी; “द नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६” चे ठरले विजेते

मंडणगड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मंडणगड तालुक्यातील वडवली गावचे सुपुत्र रोशन मोडकले यांनी रेनबो प्रॉडक्शन आयोजित “द नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६” या स्पर्धेचे विजेतेपद पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रेनबो प्रॉडक्शन आयोजित “द नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६” या नंदुरबार येथे पार पडलेल्या या भव्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून प्रतिभावान स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. व्यक्तिमत्त्व, कलात्मकता, आत्मविश्वास, रॅम्प वॉक, मंचावरील उपस्थिती, संवादकौशल्य आणि एकूण सादरीकरणाच्या आधारे झालेल्या या स्पर्धेत रोशन मोडकले यांनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या आणि दमदार सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

“द नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६” या स्पर्धेचे आयोजन रेनबो प्रॉडक्शनतर्फे करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजक लकी सोनीस होते, तर स्पर्धकांचे मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकासाची जबाबदारी हीना पाडवी यांनी सांभाळली होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून बीके राहुल आणि कविता सोनीस यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील विजेते म्हणून रोशन मोडकले यांना मानाचा मुकुट, विजेतेपदाची ट्रॉफी, सन्मानपत्र आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच त्यांना कला आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध प्रकल्प, ब्रँड शूट आणि प्रिंट शूटच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या. या उल्लेखनीय यशाबद्दल भावना व्यक्त करताना रोशन मोडकले म्हणाले, “हा फॅशनचा टायटल माझ्यासाठी केवळ एक ट्रॉफी नसून आयुष्यभरासाठी प्रेरणेचा स्रोत आहे.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण प्रवासाने मला आत्मविश्वास, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण दिली. या यशाचे संपूर्ण श्रेय मी माझ्या आई-वडिलांच्या संस्कारांना, गावच्या मातीला आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्याला देतो. माझे वडवली गाव हीच माझी खरी ओळख असून, माझ्या गावाचे नाव मोठे करणे हेच माझे सर्वात मोठे ध्येय आहे.” या यशामुळे मंडणगड तालुक्यातील वडवली गावासह त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून रोशन मोडकले यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फॅशन, कला आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या आगामी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg