loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. शाळा बामणडोंगरी येथे शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना वह्यावाटप

पनवेल- जि. प. शाळा बामणडोंगरी येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमांतर्गत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मा. उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, शिवसेना जिल्हाप्रमुख विनोद साबळे, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, जिल्हा संघटक महेंद्र पाटील, महिला प्रवक्ता विनिता बर्फे, विभागप्रमुख संकल्प घरत, नामदेव ठाकूर तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही शिवसेनेच्या या शैक्षणिक उपक्रमाचे स्वागत केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg