खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या 15 मार्च 2024 च्या शासन निर्णय आधारे ग्रामीण भागातील विशेषता कोकणातील कमी पटसंख्या असणाऱ्या मराठी माध्यमाच्या अनुदानित वर्षानुवर्ष चालणाऱ्या माध्यमिक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असल्याने कोकणातील बहुसंख्य तरुण हे नोकरी निमित्त मुंबई, पुणे व अन्य शहराच्या ठिकाणी जात असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी वर्ग जो ग्रामीण जीवन टिकून ठेवण्यास मदत करत आहे. या शेतकरी वर्गातील मुले सध्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र शेतकरी जीवन उध्वस्त करण्याचा घाट जणू शासनाने घातला आहे तो म्हणजे कमी पटसंख्या असल्यामुळे शाळेतील शिक्षकांचे समायोजन करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील गेली 60 ते 70 वर्षापासून सुरू असलेली शिक्षण प्रणाली बदलत आहे व यामुळे शेतकरी जीवन देखील उध्वस्त होऊन गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार आहे.
आई-वडिलांना शेतीकामासाठी मदत करून गाव किंवा परिसरात असणाऱ्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण घेणारी मुले या शिक्षणापासून वंचित होत असल्याचा धोका निर्माण होत आहे. याला कारण 15 मार्च 2024 शासन निर्णयाप्रमाणे पुरेशी पटसंख्या न झाल्यास तेथील शिक्षकांचे समायोजन करून शाळा बंद पडल्या जात असल्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. ग्रामीण जीवन व्यवस्था टिकून असणारे गोरगरीब शेतकरी वर्गातील जी मुले आहेत त्यांना न्याय मिळावा., यासाठी ज्या शाळा आहेत त्या टिकून राहव्यात म्हणून हे उपोषण केले जात आहे. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ तिसंगी संचलित नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी या माध्यमिक शाळेमध्ये देखील गेल्या अनेक वर्ष वर्षापासून नियमित्व सुरळीत चालू असणारी शाळा दोन ते तीन वर्षांमध्ये कमी झालेली पटसंख्या यामुळे येथील चार शिक्षकांचे समायोजन झाले असून आता पाचवी ते दहावीच्या सहा वर्गासाठी फक्त दोनच शिक्षक उपलब्ध आहेत.
अशा वेळेला या शाळेतील शेतकऱ्यांनी गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षणाचे काय? त्यांना शिक्षण कसे मिळणार? ही मुलं शिक्षणापासून वंचित राहू शकतात त्यामुळे 15 मार्च 2024 च्या या शासन निर्णयावर फेर विचार करून संस्थेला अपेक्षित पटसंख्या राखण्यासाठी संधी देण्यात यावी. शासन निर्णयाचा अन्यायकारक पद्धतीने बसलेला फटका दूर करून त्वरित शासनाने संबंधित शिक्षक द्यावेत व संस्थेला विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी मुदत द्यावी याकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ.श्री.अजित भोसले व ग्रामस्थ सोमवार दिनांक सहा जुलै 2026 पासून पंचायत समिती खेड समोर उपोषणाला बसत आहेत. या योग्य ती कार्यवाही होणे बाबतचे निवेदन यापूर्वीच उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, पालकमंत्री, आमदार, जि.प. अध्यक्ष, सभापती, उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. तरी यावर त्वरित तत्परतेने विचार व्हावा अन्यथा हे उपोषण अधिक तीव्र पद्धतीने केले जाईल असा इशारा डॉ. अजित भोसले यांनी दिला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.