loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्यटन महामंडळाच्या अजब नियोजनामुळे एक कोटीच्या हाऊसबोटीला वापरापूर्वीच जलसमाधी

मंडणगड (शशिकांत राऊत) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंडणगड तालुक्यातील वेसवी बंदरात जलपर्यटनासाठी १ कोटी रूपये खर्च करून सन २०१६/१७ मध्ये १ हाऊसबोट जल पर्यटनासाठी उपलब्ध करून दिली होती. या उपलब्ध करून दिलेल्या हाऊसबोटीमध्येच राहण्याची सोय होती. पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांना कोकण समुद्र किनारपट्टीचे नैसर्गिक सृष्टीसौदर्य या बोटीच्या सफरीतून पाहता येणार होते. मात्र ही हाऊसबोट चालविण्यासाठी ठेका घेणा-याला तब्बल २५ लाखाची अनामत रक्कम भरावी लागणार होती. जलपर्यटनाचा नव्याने सुरू होणारा व्यवसाय किती प्रमाणात होईल याचा ठेकदाराला भरवसा नसल्याने एवढी मोठी अनामत रक्कम भरून कोणीही हाऊसबोट चालविण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे जलपर्यटनाची एमटीडीसीची संकल्पना केवळ कागदावरच राहीली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एमटीडीसीला हाऊस बोट चालविण्यासाठी ठेकेदारच मिळाला नाही. त्यामुळे एम. टी. डी. सी. ची हाऊस बोटीची संकल्पना कागदावरच राहीली आणि वापराविना हाऊसबोट पार सडून गेली. त्यामुळे हाऊसबोट खरेदीसाठीचा शासनाचा १ कोटीचा विकास निधी हा एमटीडीसीच्या नाकर्तेपणामुळे वाया गेला. सन २०१६/१७ मध्ये एमटीडीसीने वेसवी बंदरात आणून उभ्या केलेल्या या हाऊसबोटीत राहण्याची सोय होती. बोटीत २ अलिशान रूम होते. जलपर्यटन करणा-या पर्यटकांना एमटीडीसीने १० तासाच्या जलपर्यटनाची अट घातली होती. या जलपर्यटनासाठी ८ हजाराचे भाडे आकारले जाणार होते.

टाईम्स स्पेशल

या भाडयामध्येच जेवण, चहा-नास्ता आदी सुविधा अंतभुर्त होत्या. मात्र यासाठी नेमण्यात येणा-या ठेकेदारांला २५ लाख रूपयाची अनामत रक्कम निर्धारीत केली होती. त्यामुळे एवढी भरमसाठ रक्कम भरून व्यवसाय होईलच याची खात्री नसल्याने कोणीही हा ठेका घेतला नाही. त्यामुळे हाऊसबोट सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला खाडी ठिकाणी सडत पडली असल्याचे विदारक चित्र सफर करणार्‍यांच्या दृष्टीत पडत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg