loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे आमदार सुलभाताई गायकवाड यांचा सत्कार..!

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी (मुंबई विभाग) यांच्या वतीने आज कल्याण पूर्वेच्या आमदार श्रीमती सुलभाताई गायकवाड यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मंगलोर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळवून दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने आमदार महोदयांचा शाल आणि श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, या भेटीदरम्यान कोकणातील प्रलंबित असलेल्या सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी महत्त्वपूर्ण विनंती वजा मागणीही संघटनेतर्फे आमदार गायकवाड यांच्याकडे करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी . विनोद नाईक (मुंबई अध्यक्ष), श्री. प्रसन्न कलमस्टे (ठाणे विभाग संघटक), श्री. दर्शन नाईक (उल्हासनगर विभाग समन्वयक) तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्ठीत्म होते .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg