मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्ग येथे सोमवारी भरत असलेला आठवडा बाजार बंद करण्यात येऊ नये, या मागणीचे पत्र शिवसेना मालवण महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका निना मुंबरकर यांसह नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष ममता वराडकर यांना देण्यात आले. यावेळी मालवण नगरपरिषद समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नंदिता हडकर, प्रसन्ना तुळसकर, रश्मी तुळसकर, दिनेश किडये, किरण राठोड आदी उपस्थित होते.
देऊळवाडा येथे गेल्या काही वर्षांपासून सोमवारी आठवडा बाजार भरत असून, तो मालवण शहरासह वायरी, कुंभारमाठ, आडारी, कोळंब, घुमडे आदी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा ठरत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व आसपासच्या गावांतील नागरिकांना या बाजाराचा मोठा लाभ होत आहे. देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करण्याबाबत शासन स्तरावर निवेदन देण्यात आल्याचे समजत असल्याने नागरिकांनी त्याला विरोध दर्शविला आहे. बाजारामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यास त्यावर पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
सोमवारी बाजाराच्या दिवशी पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देणे, रस्त्यालगत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी निश्चित बैठक व्यवस्था व नियमावली तयार करणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीवर ठराविक वेळेस निर्बंध घालणे तसेच आवश्यकतेनुसार वाहतूक नियोजन करणे, अशा उपाययोजनांचा विचार करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सार्वत्रिक लोकहिताचा विचार करून देऊळवाडा येथील सोमवारी भरणारा आठवडा बाजार बंद करू नये, तसेच याबाबत तहसीलदार, मालवण आणि मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना पाठवून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती नागरिकांनी नगराध्यक्षांकडे केली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.