loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल व जूनियर कॉलेज कर्मचाऱ्यांसाठी ५ लाखाचा मेडिक्लेम विमा

खेड - खेडमधील एक अग्रणीय शैक्षणिक संस्था एम.आय.हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यूनियर कॉलेजच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी रु.५ लाखचा कुटूंब सहित विमा संस्थेचे सर्वेसर्वा बशीरभाई हजवानी यांनी न्यू इंडिया एशोरन्स कंपनी ली. यांच्याकडे चेक देऊन केला. या वेळी त्यांनी सांगितला की आमच्या संस्थेत काम करणारे सर्व कर्मचारी आमच्या कुटुंबासमान आहेत. या अनुषंगाने कुठल्याही कर्मचार्‍याला अचानक आजार अथवा अपघात झाला तर त्यांच्यावर आर्थिक संकट येऊ नये, म्हणून मेडिक्लेमची स्कीम आम्ही सुरू करीत आहोत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मला आशा आहे की आमचे स्टाफ तन-मन-धन लावून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करतील. या पॉलिसी संदर्भात विमा प्रीमियम धनादेश नुकताच न्यू इंडिया एशोरन्स चे बिज़नेस असोसिएट हनीफ घनसार यांना सुपूर्त केला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा टिसेकर व लायन्स क्लब खेडचे माजी अध्यक्ष रोहन विचारे हे उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg