loader
Breaking News
Breaking News
Foto

टोपीवाला हायस्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मयेकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून स्कूल कमिटीचे अध्यक्ष खंडाळेकर तसेच शाळेच्या माजी शिक्षिका श्रुती बांदेकर उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक वळंजू यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात सन २०२५–२६ च्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्रज्ञा परीक्षा आणि NMMS परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा व संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचा टोपीवाला विद्यार्थी सहकारी भांडारतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या तसेच आपल्या विषयात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवून देणाऱ्या शिक्षकांचाही संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

याच कार्यक्रमात शिक्षिका तांबे यांची कराओके स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी निवड झाल्याबद्दल, तसेच शिक्षक सुधीर गोसावी यांनी तबला विशारद स्पर्धेत प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त करताना शाळेने दिलेले मौल्यवान शिक्षण, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक बर्वे व ज्योती बुवा- तोरसेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना सामंत व शिरोडकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg