वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील गुहागर देवपाट रामेश्वर स्मशानभूमी येथील लोखंडी शवदाहीनीचे निकृष्ट दर्जाचे व जुन्या भंगारातील गंजलेले व रंगरंगोटी केलेले लोखंडी साहित्याने बांधल्याबाबत तात्काळ चौकशी व कारवाई करणेबाबत शिवसेना (उबाठा) पक्षाच्या गुहागर शहराच्या वतीने गुहागर शहर प्रमुख सिद्धिविनायक जाधव यांनी गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, गुहागर शहरातील सर्वात मोठी व एकमेव मध्यवर्ती गुहागर देवपाट रामेश्वर स्मशानभूमी येथे लाखो रुपये खर्च करून प्रशासकीय कार्यकाळात चार आरसीसी प्रेतदाहीन्या (स्मशानभूमी) बांधण्यात आल्या या गोष्टीला जवळ जवळ दोन ते अडीच वर्षे उलटूनही लाखो रूपये खर्च होऊनही त्या झालेल्या ईस्टीमेंट मधे प्रेतदाहीन्यांचे माहीत्याचे (प्रेत जाळण्याचे) ईस्टीमेंटच पकडले नाही. असा भोंगळ कारभार गुहागर नगरपंचायत प्रशासन आणि इंजिनीअर व कंन्सल्टंट तसेच त्यांचाच लागेबांधे असलेल्या कॉन्ट्रॅक्टरने केला आहे. आज या स्मशानभूमी मध्ये जवळजवळ १४ ते १६ विभागातील प्रेते अंत्यविधीसाठी आणली जातात तसेच बेवारस प्रेतेही येथेच अंत्यविधीसाठी आणली जातात.
नवीन आरसीसी स्मशानभूमी इमारत बांधुन दोन ते अडीच वर्षे होऊनही त्या मध्ये प्रेते जाळण्यासाठी गैरसोय व प्रतिक्षाच करण्याची वेळ गुहागर वासीयांवर आली आहे. वेळोवेळी प्रशासनाला पत्र, निवेदन व जाब विचारून सुद्धा काहीच कार्यवाही होत नाही. आज नव्याने उभारण्यात आलेल्या लोखंडी प्रेतदाहीन्यांच्या कामात गंभीर अनीयमितता व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत खालील प्रमाणे वस्तू स्थिती आपल्या निदर्शनास आणून देत आहे.दिलेल्या डिझाईनची पाय मल्ली: सदर प्रेतदाहीनीचे डीझाईन हे स्मशानभूमी वार्ड मधील प्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी दिले होते. कारण नवीन काम करताना नगरपंचायत प्रशासनाच्या प्रेत जाळण्यासाठीच्या लाकडाची बचत कशी होईल व कार्यक्षम असे नवीन डिझाईन आम्ही संबंधित इंजिनियर, ठेकेदार व शाखा अभियंता यांना लेखी व प्रत्यक्ष स्केच दाखवुन (फोटो) व समजावून दिले होते मात्र त्या डिझाईनला पूर्ण पणे डावलून जुन्याच पारंपारिक व अकार्यक्षम निकृष्ट पद्धतीने काम करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा निधी वाया जाऊन जनतेची फसवणूक झाली आहे. जुन्या भंगार लोखंडी साहित्याचा वापर व डिझाईन बदलास जबाबदार असणाऱ्या नगरपंचायत शाखा अभियंता, इंजिनियर व ठेकेदार यांच्यावर कंत्राटी अटीभंग व निधीचा अपव्यय केल्याप्रकरणी तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. आणि ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे.
सदर निकृष्ट प्रेतदाहीनी तात्काळ पाडून ग्रामस्थांनी दिलेल्या डिझाईन प्रमाणे व नवीन मानक व चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून पुन्हा नवीन बांधण्यात यावे. याचा संपूर्ण खर्च संबंधित ठेकेदाराकडून व इंजीनीअर कडून वसुल करण्यात यावा. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे उर्वरित देयक थांबवण्यात यावे. स्मशानभूमी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. २०२४/२५ च्या आमसभेमध्ये दिलेल्या लेखी तक्रारीवरून आमसभेचा ठराव होऊनही योग्य आश्वासनां नंतरही गैर व्यवहार होणे हे गुहागरच्या जनतेच्या भावना दुखावणारे आहे. तरी आपण स्वतः लक्ष घालून सात दिवसांत चौकशी सुरू करून केलेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा ही विनंती. अन्यथा आमसभेचा अवमान केल्याप्रकरणी आम्हाला लोकशाही मार्गाने आआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी. सदरची प्रत आमदार भास्कर जाधव,जिल्हाधिकारी , रत्नागिरी, तहसीलदार, गुहागर यांना पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराध्यक्ष सिद्धिविनायक जाधव, शहर महिला संघटिका सारिका कनगुटकर, युवासेना शहरप्रमुख राज विखारे, शहर सचिव पराग मालप, उपशहर प्रमुख पराग मोरे, शाखाप्रमुख प्रभुनाथ देवळेकर, चंद्रकांत साळवी, वृंदा शिंदे आदी उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.