मुंबई : “लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्ण आंदोलन करत असेल तर त्याला परवानगी दिली जाईल. मात्र, जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे, हे कुठल्याही परिस्थितीत योग्य नाही, त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत काल हजारोंच्या संख्येने दिल्लीत कॅाकरोच जनता पार्टीच्या समर्थकांनी संसदेकडे धाव घेतली. यादरम्यान, आंदोलकांना रोखताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे ते म्हणाले, “दिल्लीत आंदोलन झाले, त्यामध्ये अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करत आहेत. अनेक संघटना, ज्यांचं या विषयाशी घेणेदेणे नाही, ते अराजकता निर्माण कशी होईल, त्याचे प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं, दिल्लीत नेतृत्त्वहीन व्यवस्था पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या उलटवणे, फोडणे असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. दिल्लीत सुरु असलेले विद्यार्थी आंदोलन चेहरा नसलेले आहे. त्यामुळे या आंदोलनात काही लोक वेगळा अजेंडा घेऊन घुसले आहेत.”









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.