मंडणगड (प्रतिनिधी) : मुंबई येथील सुप्रसिध्द संवेदना फाउंडेशनच्या वतीने मंडणगड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मंडणगड तालुक्यातील ३ महाविदयालयातील विदयार्थी तसेच ८ हायस्कूल मधील विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षारोपण देखील करण्यात आले. मंडणगड चिंचाळीचे सुपुत्र आणि निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश घडवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विदयार्थी गुणगौरव आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे आयोजक आणि संवेदना फाउंडेशन मुंबई चे अध्यक्ष विनोद चाळके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय मंडणगडच्या प्राचार्या प्रतिभा पाटील, मंडणगड पंचायत समितीचे उपसभापती दिपक मालुसरे, भारतीय सैन्यदलाचे जवान सचिन गायकवाड, भारत सरकारच्या खेळ व क्रीडा मंत्रालयाचे प्रतिनिधी विशाल काकडे, नाट्य दिग्दर्शक शैलेश फणसगावकर, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता राम जाधव, रजनीकांत धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत घाडगे, संजय शिंदे, प्रविण लाड आदी विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मंडणगड भोळवली या गावचे भुमीपुत्र असलेले विनोद चाळके हे आपल्या संवेदना फाउंडेशन मुंबई च्या वतीने सातत्याने गेली अनेक वर्षे विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रिडाविषयक क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन समोर ठेवून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहेत. त्यातीलच एक असलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा, तसेच झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा... असा संदेश देणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे मंडणगड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजन करुन तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मंडणगड ,कर्मवीर दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालय कुंबळे, एस.पी.कॉलेज मंडणगड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, लाल बहादुर शास्त्री हायस्कूल दहागाव, लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण, पणदेरी - पेवे पंचक्रोशी हायस्कूल, राजीव गांधी इंग्लिश मिडीयम स्कूल मंडणगड, शहीद तुकाराम भोईटे हायस्कूल कुंबळे या विद्यालय आणि महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकाच्या गुण गौरवाचा सन्मान करण्यात आला. तर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रतिभा पाटील, मुख्याध्यापक बाबासाहेब हुलगे, उप मुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी व समाजसेवक लक्ष्मण कदम यांचा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमातच दिव्यांग क्रिकेटर सुधिर भोसले, १०० मिटर धावणे स्पर्धेत तालूक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या लाटवण येथील समृध्दी सकपाळ या गुणवंतांचा देखील विशेष गौरव करण्यात आला. यावेळी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी पर्यावरण रक्षण आणि सामाजिक कार्यात तरुण पिढीचा सहभाग वाढवण्यासाठी फाउंडेशन नेहमीच कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थी गुणगौरव आणि वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद चाळके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अजय शिगवण, समीर म्हाब्दी, नंदू निकम, प्रसाद पांचाळ, विकास चाळके, ओंकार चाळके, दिपक गुप्ता तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य अर्जुन हुल्लोळी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी पर्यावरण संवर्धन म्हणून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.