दाभोळ (वार्ताहर) – ए.के.आय. ट्रस्ट, मुंबई संचलित ए.के.आय. उर्दू सेमी इंग्लिश हायस्कूल, दाभोळ येथे पदभार सोपविण्याचा समारंभ तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघ स्थापना सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात दिमाखात पार पडला. या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली असून मुख्य विद्यार्थिनी म्हणून जोया जाकीर निलिक्कर व मुख्य विद्यार्थी म्हणून सदिम सईद नाखवा यांची निवड करण्यात आली. एकूण २१ विद्यार्थ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवून सक्षम विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. शाळेतील विद्यार्थी मंत्रिमंडळाने लाल गालिच्यावरून शिस्तबद्ध व दिमाखदार संचलन करत प्रवेश केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बिल्ले प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण शैलीत स्वतःची ओळख करून दिली. शपथविधी सोहळ्यात सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी आपली जबाबदारी निष्ठा, प्रामाणिकता व समर्पणभावाने पार पाडण्याची शपथ घेतली. “हम होंगे कामयाब” या प्रेरणादायी गीताने वातावरण भारावून गेले.
त्यानंतर उपसभापती नम्रता तोडणकर, केंद्रप्रमुख दिलीप जाधव व शाळेचे मुख्याध्यापक इमरान दाऊद खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले. उपसभापती तोडणकर यांनी पंचायत समितीमार्फत शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय गरजांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघ स्थापना सोहळा पार पडला. मागील वर्षीच्या समिती सदस्यांचे योगदानाबद्दल आभार मानून त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली व समिती विसर्जित करण्यात आली. नव्या समितीच्या अध्यक्षपदी वाहीद सदरुद्दीन निलिक्कर तर उपाध्यक्षपदी रेशमा शकील मुकादम यांची निवड करण्यात आली. सर्व सदस्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी अब्दुल करीम हसन बैग यांनी यावर्षीच्या माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यास रुपये १०,००० चे रोख पारितोषिक प्रदान केले तसेच पुढील वर्षीही अशीच पारितोषिक योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आफरीन शेख यांनी सुरेख, ओघवत्या व प्रभावी शैलीत पार पाडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेले अथक परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरले. शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी, प्रगत समिती तसेच झर्फ एम एच ओ ग्रुप, दुबईचे जाकीर हुसेन चौगले, अब्दुल करीम हसन बैग, मोअज्जम माहतायी, फरनाज नाटेकर (नूर-ए-खिदमत ट्रस्ट, खेड), बदरुद्दीन बुखारी आणि सर्व पालक यांच्या सहकार्याबद्दल शाळेने कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमास पंचायत समिती दापोलीच्या उपसभापती नम्रता तोडणकर, केंद्रप्रमुख दिलीप जाधव, प्रगत समिती सदस्य व माजी विद्यार्थी वाहीद निलिक्कर, कबीर मनियार, मुदस्सर ममतुले, साजिद जमादार, अजीम दर्वेश, बदरुद्दीन बुखारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेशमा मुकादम यांच्यासह मान्यवर, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.