loader
Breaking News
Breaking News
Foto

१५ जुलै रोजी अंजनवेल येथे असगोली जिल्हा परिषद गटाची प्रभाग समिती बैठक

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी असगोली जिल्हा परिषद गटाची प्रभाग समिती बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रामपंचायत अंजनवेल येथे होणार असून, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभाग समिती अध्यक्ष विक्रांत भास्करराव जाधव राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीमध्ये विविध विभागांच्या विकासकामांचा विभागनिहाय आढावा, प्रलंबित कामांवरील चर्चा तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. या बैठकीस सरपंच, ग्रामपंचायत प्रशासक, लोकप्रतिनिधी तसेच असगोली जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासकामांबाबतच्या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभाग समिती अध्यक्ष विक्रांत भास्करराव जाधव यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg