loader
Breaking News
Breaking News
Foto

शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलच्या नागेंद्र तारीचा जिल्हा गुणवत्ता यादीत ४७ वा क्रमांक

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) २०२६ मध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी नागेंद्र युवराज तारी याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत ४७ वा क्रमांक मिळविला. तसेच रेणुका गुरुनाथ चव्हाण आणि रिया प्रसाद केळुसकर या विद्यार्थिनीही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशासाठी नागेंद्र तसेच इतर विद्यार्थ्यांना शाळेच्या सहाय्यक शिक्षिका पूनम मेस्त्री, अस्मिता वाईरकर आणि सरोज बांदेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg