loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद उफाळला, अंतर्गत गटबाजी समोर , सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष पदाला आव्हान!

मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद उफाळला, अंतर्गत गटबाजी समोर आली आहे . सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष पदाला आव्हान देण्यात आले आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरून पक्षात नवा वाद निर्माण झाला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते सचिदानंद सिंह यांनी ही नियुक्ती पक्षाच्या संविधान आणि नियमानुसार झालेली नसल्याचा दावा करत पक्ष नेतृत्वाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2023 मध्ये झालेल्या फुटीनंतर अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर पक्षाने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. मात्र, या नियुक्तीवर आता पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.ज्येष्ठ नेते सचिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झालेली निवड प्रक्रिया पक्षाच्या संविधानानुसार पार पडलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मंजुरी, निवड प्रक्रियेतील पारदर्शकता आणि संघटनात्मक नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे.दरम्यान, या नोटीशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, या घडामोडीमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, आगामी काळात या वादावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg