loader
Breaking News
Breaking News
Foto

मुसळधार पावसामुळे लांज्यात ४ वीज पोल पडून वीज पुरवठा खंडित, २६ तासानंतर स्थिती पुर्ववत

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील मुजावरवाडी परिसरात जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे मोठे झाड कोसळून उच्चदाब विद्युत वाहिनीचे चार पोल पडले होते. या घटनेमुळे लांजा शहरासह परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. अखेर बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता तब्बल २६ तासांनंतर शहरासह चार हजार ग्रामीण ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेत झाड घरावर पडले होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु झाड कोसळल्यामुळे विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परिणामी लांजा शहरातील बहुतांश भाग अंधारात बुडाला होता. तर या कालावधीत नागरिकांना पाणीपुरवठा तसेच व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. घटनास्थळावरील विद्युतवाहिन्या कोर्ले फीडरवरून असल्याने या बिघाडाचा परिणाम शहरासह ग्रामीण भागावरही झाला. यामध्ये लांजा शहरातील तेलीवाडी, वैभव वसाहत, कुंभारवाडी, नामदेव नगर, पूर्व बाजारपेठ, मारिगोल्ड परिसर, आडाचा मार्ग, उपशेट्येवाडी, बेलवलकर शॉपिंग परिसर तसेच आसगे, बेनी, वाडगाव, खेरवसे, विवली, केळंबे, आडवली, कुरचुंब, हसोळ आदी ग्रामीण भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

टाईम्स स्पेशल

या बिघाडामुळे शहरासह ग्रामीण भागातील सुमारे चार हजार ग्राहक अंधारात होते. अशातच महावितरणच्या कर्मचार्‍यांनी अखंडितपणे काम सुरू ठेवत नुकसानग्रस्त पोल बदलणे, वाहिन्यांची दुरुस्ती करणे आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन केल्याने अखेर बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता तब्बल २६ तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg