loader
Breaking News
Breaking News
Foto

अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या दफ्तरांची तपासणी; कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही

दोडामार्ग : अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे विद्यार्थ्यांच्या दफ्तरांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी दोडामार्गचे गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष शिक्षक दिगंबर काळे यांच्या उपस्थितीत पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दफ्तरांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याकडे आक्षेपार्ह अथवा अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शाळा प्रशासनाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहून निरोगी व जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, वर्गशिक्षक आनंद बामणीकर, उच्च माध्यमिक विभागाचे मांगले तसेच गवस उपस्थित होत्या. शाळेत सुरक्षित, व्यसनमुक्त आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg