loader
Breaking News
Breaking News
Foto

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञान शिक्षकांसाठी ‘केम अमेझ’ कार्यशाळा संपन्न; १५० हून अधिक शिक्षकांचा सहभाग

​सावंतवाडी, (प्रतिनिधी): पुणे नॉलेज क्लस्टर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उपक्रमशील आणि तंत्रस्नेही विज्ञान शिक्षकांसाठी ‘केम अमेझ’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गेमिफिकेशनच्या (खेळातून शिक्षण) माध्यमातून रसायनशास्त्र हा विषय अधिक प्रभावी, आकर्षक आणि आनंददायी बनवणे हा या अभिनव उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.​राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत असलेल्या या कार्यशाळेचे आयोजन जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले होते. ​शिक्षकांसाठी कार्यशाळा एस.पी.के. कॉलेज हॉल (सावंतवाडी) आणि एच.पी.सी.एल. हॉल (कणकवली कॉलेज) तर ​विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा माऊली माध्यमिक विद्यालय (सोनुर्ली), मदर्स क्वीन्स इंग्लिश स्कूल (सावंतवाडी) व खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल (बांदा).

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेत पुणे नॉलेज क्लस्टरच्या जानवी अग्रवाल, शितल नागपुरे, चिन्मय स्वामी आणि निहारिका गोगटे यांनी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल गेम-आधारित साधने, खेळ आणि प्रयोगांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील १५० हून अधिक माध्यमिक विज्ञान शिक्षक तसेच बी.एस.सी. आणि एम.एस.सी.च्या विद्यार्थिनींनी घेतला. ​श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेचे उद्घाटन सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त श्रद्धाराजे लखमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा विज्ञान मंडळातर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. ​व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत खेमसावंत भोसले, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, उपक्रम समन्वयक तथा जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, ऋषिकेश गावडे, संजय शेवाळे, प्रिती सावंत, राजाराम फर्जंद, रुपेश कर्पे, नेहा दळवी आणि सोनाली बांदेलकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

​कणकवली कॉलेजमधील कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा साळुंखे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष रघुनाथ कारेकर, सचिव सत्यपाल लाडगावकर, सुषमा केनी आणि प्रणिता बांबूळकर उपस्थित होते. कणकवली येथील नियोजनासाठी तालुका अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण व पृथ्वीराज बर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. ​उपक्रम समन्वयक पांडुरंग काकतकर यांच्या नियोजनातून यशस्वी झालेल्या या उपक्रमाला शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर आणि सविता परब यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांमध्ये नवचैतन्य पसरले असून, आधुनिक व आनंददायी विज्ञान अध्यापनाचा पाया रचला जात आहे, असा सूर मान्यवरांनी आपल्या गौरवोद्गारातून काढला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg