सावंतवाडी(प्रतिनिधी)- अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा डेटा गोळा करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे. प्रसंगी मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन समाजाचे प्रतिनिधित्व करत, समाज नेतृत्व जिवंत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, असे उद्गार सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आणि मंडळाचे माजी अध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर यांनी काढले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून समाजमंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी लाईफटाईम प्रोव्हिजन करण्यात आली असून, आता कार्यक्रमांसाठी कोणाकडेही हात पसरण्याची गरज उरलेली नाही, असा दिलासाही त्यांनी दिला.
ते सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्नेहमेळावा कार्यक्रमात बोलत होते. सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण होते. यावेळी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच समाजातील ज्येष्ठ व निवृत्त नागरिकांचाही शाखेतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात विजय चव्हाण म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांनी आता पुढील शिक्षण घेऊन एमपीएससी, यूपीएससी परीक्षांद्वारे अधिकारी बनावे आणि समाजाची मान वाढवत उत्कर्षासाठी प्रयत्न करावेत. आमची कौतुकाची थाप कायम त्यांच्या पाठीशी राहील.
कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी शाखा अभियंता विजय चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधीर जाधव, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, नामदेव चव्हाण, नरसू रेडकर, ऋषिकेश चव्हाण, स्वप्नील चव्हाण, जिल्हा समन्वयक बाबुराव चव्हाण, लवू चव्हाण, दिलीप इन्सुलकर, माजी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर तळकटकर, तालुका सचिव जगदीश चव्हाण, निवृत्त उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश तिवरेकर, लक्ष्मण आरोसकर, संजना चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, विजय ओटवणेकर, सुधाकर बांदेकर, शांताराम पवार, एकनाथ चव्हाण, संभाजी कांबळे, नरेश कारिवडेकर व कल्याण कदम आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव जगदीश चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम समाजबांधवांच्या दातृत्वावर आणि देणगीच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पडल्याचे नमूद करत त्यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना चव्हाण यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.