loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत, जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट

मुंबई- मुंबईतील एका पंचताराकित हॉटेलमध्ये शरद पवार गटातील नेते जयंत पाटील आणि भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडली आहे. या नव्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शरद पवार गट महायुतीमध्ये सहभागी झाला तर त्यांच्या वाटेला सत्तेत नेमके काय मिळू शकते? याची चर्चा झाली असून सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याबाबत चाचपणी झाल्याचे समजते. या बैठकीनंतर पुढील रणनितीबाबत ज्येष्ठ नेत्यांसोबत संवाध साधण्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीए मध्ये जाणार असल्याच्या चर्चेबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी सार्‍या चर्चा फेटाळून लावल्या. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी अणि कष्टकर्‍यांचे प्रश्न मांडत राहू असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगिते आहे की, चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा मात्र सुरु आहे एवढे नक्की. छत्रपती शिवरायांच्या, भारतरत्ना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फूले यांच्या पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवायचा की, धन संपत्ती आणि सत्ता यावर विश्वास ठेवून काम करायचे, हे त्यांनी ठरवावे, त्यावर मला भाष्य करायची गरज नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg