loader
Breaking News
Breaking News
Foto

नॅशनल मेडिकल्समध्ये २५ वर्षांहून अधिक सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी : ग्राहकसेवा, प्रामाणिकपणा आणि समर्पण या मूल्यांना जपत गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या नॅशनल मेडिकल्सतर्फे संस्थेत २५ वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीची उल्लेखनीय सेवा पूर्ण केलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या खालील कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला : 1. संजय दत्तात्रय पेनकर 2. संतोष हरी पेजे 3. गोपाळ लक्ष्मण घवाळी 4. उमेश धर्माजी कळंबटे 5. संतोष विष्णु कळंबटे,, या सर्व कर्मचाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ निष्ठा, प्रामाणिकपणा, उत्कृष्ट व्यावसायिकता आणि ग्राहकसेवेची अखंड परंपरा जपत संस्थेच्या यशामध्ये अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि सहकार्यामुळे नॅशनल मेडिकल्सने ग्राहकांचा विश्वास संपादन करून औषध सेवा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सन्मान सोहळ्याच्या वेळी चंदनमल ओसवाल, भरत ओसवाल, दिनेश ओसवाल, प्रणव ओसवाल, निरल ओसवाल आणि नदिम मुजावर यांनी सन्मानित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेच्या उभारणीत आणि सातत्यपूर्ण प्रगतीत या कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी व्यवस्थापनाने सर्व सन्मानित कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या कार्यातून इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg