loader
Breaking News
Breaking News
Foto

खवटीमध्ये चोरद नदीच्या पुराचे पाणी घरात घुसून नुकसान

खेड - गेले दोन चार दिवस मुसळधार पावसाने थैमान घातल्याने खेड तालुक्यातील खवटी गावातील देऊळवाडी येथे चोरद नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीच्या पुराचे पाणी नरेश भिकाजी दळवी, प्रविण भिकाजी दळवी याच्या घरात घुसून संरक्षण भिंत कोसळून जवळपास ५०,०००/- रुपयाचे नुकसान झाले आहे. परंतु झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी तथा महसुल ग्राम अधिकारी आणि ग्राम विकास अधिकारी यांना घटनेची माहीती देऊनही घडलेल्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी वा वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी संबंधीत अधिकारी उपलब्ध होत नाहीत. याची उपविभागीय महसुल अधिकारी खेड व तहसिलदार खेड यांनी गंभीर दखल घेऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश देऊन आम्हांला न्याय द्यावा, अशी मागणी नरेश भिकाजी दळवी, प्रविण भिकाजी दळवी या बंधूंनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg