loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातून भविष्यात शास्त्रज्ञ घडतील; विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी (वार्ताहर) : कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून, म्हणूनच राज्यात कोकण विभागाचा निकाल नेहमीच अव्वल राहिला आहे. भविष्यात याच कोकणातून शास्त्रज्ञ, आयएएस, आयपीएस अधिकारी घडून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. शिवसेना व युवासेनेच्या वतीने आयोजित दहावी व बारावीतील ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात आयोजित या सोहळ्यास नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदा मुरकर, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, बंडशेठ साळवी, नगरसेविका प्रीती सुर्वे, पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, तुषार साळवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाट्यगृहाची आसनक्षमता संपल्यानंतर आयोजकांना अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करावी लागली. अनेक पालक व विद्यार्थी उभे राहून आपल्या सन्मानाची प्रतीक्षा करत होते. कार्यक्रमासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पार पडली. युवा सेनेचे अभी दुडये, अथांग कदम, रोहित मायनाक, सर्वेश शेलार, लोभस देसाई, केदार कीर, अभी पेजे, देव मोरे, पार्थ पावसकर, ओम साळवी, ऋत्विक भंडारी, दुर्वेश पांगम, शिवसेनेचे शहर सचिव प्रथमेश साळवी यांनी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करत कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावर बारकाईने लक्ष ठेवले.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उदय सामंत म्हणाले, आम्ही तुम्हाला काय देणार यापेक्षा भविष्यात तुम्हाला काय बनायचे आहे, याचे ध्येय आजच निश्चित केले पाहिजे. कोकण विभाग सातत्याने अव्वल राहण्याचे श्रेय येथील विद्यार्थ्यांच्या मेहनतीला जाते. मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व इतर अडचणी सोडवण्यासाठी विशेष अ‍ॅप विकसित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध राहणार असून, प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतील. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहितीही या अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास उपलब्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg