loader
Breaking News
Breaking News
Foto

वारंवार वीज पुरवठा खंडितामुळे चिरणीवासीय त्रस्त

चिरणी (सुरेश देवरुखकर) - खेड तालुक्यातील चिरणी, आंबडस, शेल्डी, आदी परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. दरम्यान ग्रामस्थ वारंवार होणार्‍या वीज खंडितामुळे आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहेत. दरम्यान सोमवार व गुरुवार हे दोन दिवस वीजपुरवठा दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी खंडित केला जातो, असे असताना देखील इतर वारीसुद्धा वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ पुरते हैराण झाले आहेत. एकीकडे भरमसाठ वीज बिलामुळे वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या आंबडस परिसरात बँक, महाविद्यालय व शाळा तसेच विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी सेवा केंद्र असून परिसरातील नागरिकांची कामे या वीज खंडितामुळे होत नाहीत. दरम्यान संबंधित अधिकार्‍याने वीज पुरवठा सुरळीत चालू करावा, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg