राजापूर, (वार्ताहर) - राजापूरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अॅड. जमिर खलिफे यांच्या मोबाईलच्या व्हॉटसअॅपवर फेक लिंक पाठवून झालेल्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी राजापूर पोलीसांना तपास लावण्यात यश आले आहे. या सायबर गुन्हयात राजापूर पोलीसांनी अॅड.खलिफे यांची गेलेली ३ लाख रूपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे. राजापूर पोलीसांनी पुणे व परिसरातील ५ संशयित आरोपींविरोधात कारवाई करत त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले आहेत. राजापूर पोलीसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. दि.१६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताचे दरम्याने फिर्यादी अॅड.खलिफे यांचे वडील निजामुद्दीन खलिफे हे घरी असताना त्यांचा मोबाईल क्र.९४२२०५२५६५ या व्हाटसअॅप मोबाईलवर अज्ञात इसमाकडून आरटीओ ई चलन एपिके फाईल मेसेज त्यांना पाठविण्यात आला होता. या मेसेजमध्ये व्हेईकल रजिस्ट्रर नं.एलए०११००९ व चलन नं.एलए२१०७१७३४३११६८७ असे नमूद करण्यात आले होते. अॅड.खलिफे यांचे वडिलांनी आरटीई चलन एपिके फाईल मेसेज त्यांच्या मोबाईल क्र.९०२८४०७८६५ यावर पाठविला. फिर्यादी यांनी ती फाईल ओपन केली. त्यानंतर अॅड.खलिफे यांना आधार ओटीपीचा मेसेज आला. त्यानंतर थोडया वेळाने अॅड.खलिफे यांचे बँक शाखा राजापूरमधील सेव्हिंग खात्यातून एकूण ३ लाख रूपये अज्ञात इसमाने ऑनलाईनद्वारे डेबीट केल्याचा मेसेज अॅड.खलिफे यांना आला.
त्यानंतर अॅड.खलिफे यांचे लक्षात आले की आरटीओ ई चलन एपिके फाईल ओपन केल्यामुळे ऑनलाईन फ्रॉड होवून आपली आर्थिक फसवणूक झालेली आहे. याप्रकरणी तत्काळ अॅड.जमिर खलिफे यांनी राजापूर पोलीसांत तक्रार दिली तर ऑनलाईन फसवणूक झालेली असल्याने अॅड.खलिफे यांनी १९३० या नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदविली. याप्रकरणी राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी तपास सुरू केला. पुणे येथील फिनकॉर्प कंपनीमार्फत काहींनी कर्ज घेतले होते व त्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख यांना पुणे येथे तपासासाठी पाठविण्यात आले. त्यावेळी मितेश जालींदर वाघुले (वय-३४ रा.पांडुरंगवाडी महाळुंग तर्फे निमगाव जुन्नर जि.पुणे), किरण मच्छिंद्र नेहरकर (वय-२४ रा.येडगाव जि.पुणे), विजय काशिनाथ वो-हाडे (वय- ४५वर्षे रा.मु.केळी पो.चावंड ता.जुन्नर जि.पुणे), दत्तात्रय गंगाराम गवारी (वय-४४ रा.मु.सुकाळवेढे पो.आंबे ता.जुन्नर जि.पुणे), गंधार संजय रत्नपारखी (वय- ३३रा.वाजारपेठ लक्ष्मीनारायण मंदिराच्याजवळ पुणे), असे पाच संशयीत या प्रकरणात असल्याचे आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी येथे पत्रकारांना दिली. यातील मुख्य संशयीत आपोली शादाब अन्सारी (वय-४१रा.सन ऑफ रियासन अली नियर क्लासिक वेकरी हुंडाई चौक खालुवे चाकण तळेगाव, जि.पुणे )हा असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणात आणखी सखोल तपास पोलीस करत असून यांच्याकडून अन्य ठिकाणी अशाप्रकारे फ्रॉड झाला आहे काय याचीही तपासणी केली जात आहे. याप्रकरणी या पाचही संशयीत आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. यातील अॅड.खलिफे यांच्या मोबाईलवर फेक लिंक पाठवून ऑनलाईन फसवणूक करून काढलेले ३ लाख रूपये हे मितेश जालींदर वाघुले व किरण मच्छिंद्र नेहरकर यांच्या पुणे येथील फिनकॉर्प कंपनीमार्फत घेतलेल्या कर्जखात्यात जमा करण्यात आले होते. पोलिसांनी ही रक्कम तात्काळ अॅड.खलिफे यांच्या खात्यात वर्ग केली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे, अपर पोलीस अधिक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोबीन शेख, पोलीस कर्मचारी दिनेश आखाडे, दिगंबर शेलार, दिपक काळे यांनी तपासकामी परिश्रम घेत या गुन्हयाचा तपास लावला. राजापूर पोलसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सध्या मोठया प्रमाणावर ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. तरी नागरिकांनी याबाबत सतर्क राहणे आवशक आहे. कोणत्याही माहित नसलेल्या नंबरवरून आलेले कॉल टाळावेत तसेच मेसेज वा कोणतीही लिंक ओपन करू नये, फेक कॉल व फेक मेसेजवर विश्वास ठेऊ नये, आपली बँक डिटेल्स, ओटीपी कोणालाही शेअर करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.