loader
Breaking News
Breaking News
Foto

शिष्यवृत्ती परीक्षेत सरोज मेहता स्कूलच्या आराध्य मेहताचे यश

करंजाणी, (प्रतिनिधी) - सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी येथील इयत्ता ८ वीचा विद्यार्थी आराध्य अतुल मेहता याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक तर जिल्हास्तरावर ११ वा क्रमांक मिळवून शाळेचे, पालकांचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. आराध्यच्या या यशामागे त्याची मेहनत, चिकाटी आणि नियमित अभ्यास यांचा मोठा वाटा आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुजय मेहता, सेक्रेटरी सुयोग मेहता, खजिनदार संकेत मेहता व मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी आराध्यचे अभिनंदन केले. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg