loader
Breaking News
Breaking News
Foto

पालशेतमध्ये पावसाळी क्रिकेटचा थरार; मातब्बर १६ संघांमध्ये रंगणार विजेतेपदाची चुरस

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मानाची पावसाळी ऑल्डर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ या बहुचर्चित स्पर्धेसाठी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. ८ जुलै ते १२ जुलै २०२६ या कालावधीत दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडानगरी, पालशेत येथे ही स्पर्धा रंगणार असून, विजेत्या संघाला ७५,००० रोख रक्कम व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला ४०,००० रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या स्पर्धेत कोकणातील नामांकित आणि बलाढ्य अशा १६ मातब्बर संघांनी सहभाग नोंदविला असून, प्रत्येक संघ विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे प्रत्येक सामना चुरशीचा आणि प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेत सहभागी होणारे संघ : गुहागर इलेव्हन, तिरूपती सावर्डे, दापोली इलेव्हन, ऑल खारवी, विसू इलेव्हन, बाळू इलेव्हन, आर. जी. स्टार पालशेत, शिवाई इलेव्हन रेवस, राजे योध्दा वेळणेश्वर, दुर्वा स्पोर्ट्स रामपूर, रॉयल वॉरियर्स चिखली, सिंधुदुर्ग बॉईज, मंगलमूर्ती गणपतीपुळे, रत्नागिरी इलेव्हन, आर. डी. सी. सी. बॅक, जय भोले कारूळ आदी.. स्पर्धा ५ षटकांच्या स्वरूपात खेळविण्यात येणार असून, साखळी पद्धतीने सामने होणार आहेत. प्रत्येक संघ आपल्या सर्वोत्तम खेळाडूंना मैदानात उतरविणार असल्याने चौकार-षटकारांची आतषबाजी, अचूक गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेत मालिकावीर, सामनावीर, सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम गोलंदाज अशा वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे संघाला विजय मिळवून देण्याबरोबरच वैयक्तिक सन्मान मिळविण्यासाठीही प्रयत्नशील राहणार आहे. दर्यावर्दी प्रतिष्ठानने गेल्या २५ वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच परंपरेला साजेशा पद्धतीने यंदाची स्पर्धाही भव्य, दिव्य आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. दर्यावर्दीचा बाणा, पालशेतचा जल्ला... पावसाळी क्रिकेटचा सर्वात मोठा हल्ला! या घोषवाक्याला साजेसा क्रिकेटचा जल्लोष अनुभवण्यासाठी आयोजकांनी सर्व क्रिकेटप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg