loader
Breaking News
Breaking News
Foto

सुनील तटकरे यांच्यावर रामदास कदम यांची जहरी टीका…

मंडणगड : कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी या महायुतीतील दोन्ही घटक पक्षांमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे ते माध्यमांशी बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीकात्मक शब्दांत निशाणा साधला. तटकरे यांच्या बाबतीत काहीही होऊ शकते, ते कुणाच्याही कायमचे होऊ शकत नाहीत, अशी टीका करत कदम म्हणाले की, “सुनील तटकरे जिथे जेवेल तिथेच छेद करेल, ही तटकरेची अवलाद आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे.” कदम यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg