loader
Breaking News
Breaking News
Foto

कामगारांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे लाखो बांधकाम कामगारांना मोठा दिलासा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या विविध समस्या व संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून अनेक कल्याणकारी योजनांमध्ये सुधारणा तसेच आवश्यक त्या ठिकाणी लाभांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. बांधकाम कामगार सहाय्यक संघ, रत्नागिरी (कार्यक्षेत्र – महाराष्ट्र) यांनी वेळोवेळी कामगारांच्या अडचणी, योजनांमधील त्रुटी आणि आवश्यक सुधारणा याबाबत शासनाकडे निवेदने सादर केली होती. त्या मागण्यांची दखल घेत कामगारांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल संघटनेने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. संघटनेचे राजाध्यक्ष नारायणराव गोविंद खोराटे यांनी सांगितले की, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या कल्याणासाठी योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि लाभांमध्ये वाढ करून शासनाने कामगारांप्रती असलेली संवेदनशीलता दाखवून दिली आहे. हा निर्णय राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अत्यंत दिलासादायक असून त्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बांधकाम कामगार सहाय्यक संघ, रत्नागिरी (कार्यक्षेत्र – महाराष्ट्र) चे संचालक, पदाधिकारी तसेच महाराष्ट्रभरातील सर्व सभासदांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करत, भविष्यातही कामगारांच्या न्याय्य मागण्यांना अशाच प्रकारे न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच संघटनेचे राज्याध्यक्ष नारायणराव गोविंद खोराटे म्हणाले की, " कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात कामगारांच्या समस्या समजून घेत त्यावर ठोस निर्णय घेण्याची भूमिका स्वीकारली आहे. संघटनेने वेळोवेळी मांडलेल्या मागण्या, विविध योजनांतील त्रुटी आणि कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणींचा त्यांनी सकारात्मक विचार करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामुळे राज्यातील लाखो बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टाईम्स स्पेशल

कामगारांच्या हितासाठी सातत्याने संवेदनशील राहून योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करणे, लाभांमध्ये वाढ करणे आणि कामगारांना न्याय देण्याचा त्यांचा दृष्टिकोन निश्चितच कौतुकास्पद आहे. मंत्री महोदयांनी घेतलेले निर्णय हे कामगार कल्याणाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. बांधकाम कामगार सहाय्यक संघ, रत्नागिरी (कार्यक्षेत्र – महाराष्ट्र) तसेच महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, सभासद आणि बांधकाम कामगारांच्या वतीने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक आभार व्यक्त करतो. भविष्यातही कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने अशीच सकारात्मक भूमिका कायम ठेवावी, ही अपेक्षा आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg