मकरंद सुर्वे संगमेश्वर : काल रात्री ११ च्या सुमारास सायले माईनवाडी येथील विहिरीत एक पुर्ण वाढ झालेला बिबट्या आढळला. लगतच्या घरातील लोकांना विहिरीतून मोठा आवाज ऐकू येत असल्याने विहिरीत टॉर्च च्या प्रकाशात पाहिले असता, विहिरीतून बिबट्या वर येण्यासाठी शिताफीने प्रयत्न करताना दिसला.
नुकत्याच बांधलेल्या कॉंक्रिटच्या विहीरीतून सहज बाहेर येणे शक्य होत नसल्याने बिबट्या हतबल झाला होता. स्थानिक नागरिकांनी वेळ न दवडता देवरूख वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला.वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी विलंब न लावता फौजफाटा लवाजम्यासह उपस्थित झाले.स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी शिताफीने विहीरीत लोखंडी पिंजरा सोडून त्यात बिबट्याला जेरबंद केले. काही तासांच्या थरारक रेस्क्यु ऑपरेशन नंतर वनविभागाचे अधिकारी या बिबट्याला घेऊन निघून गेले. मानवी वस्तीत राजरोसपणे फिरणाऱ्या या वन्य श्वापदांचा बंदोबस्त करण्याची विनंती स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
घरा लगतच्या शेतात रान गवे, रान डुककरे धुडगूस घालतात. घरांच्या अंगणातून बिबट्याची स्वारी फिरते. दिवसाढवळ्या ही वन्य श्वापदे मानवी वस्तीत राजरोसपणे फिरतात. पावसाळ्यात जागोजागी बिबट्याचे ठसे आढळून येतात. स्थानिक नागरिकांच्या गायी, गुरे, शेळ्या, कोंबड्या, पाळीव प्राणी यांची शिकार ही वन्य श्वापदे करतात. आता प्रश्न एकच उरला कोण कोणाच्या अधिवासात घुसखोरी करत आहे? हा पकडलेला बिबट्या पुन्हा जवळच्या क्षेत्रात सोडण्यात येणार. मग मानवी वस्तीत शिरणाऱ्या, नुकसान करणाऱ्या वन्य श्वापदांना आवर घालणार कोण? असा सवाल विचारला जात आहे









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.