loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटेतील सहा कंपन्यांना प्रदूषण मंडळाची नोटीस; रासायनिक सांडपाण्याप्रकरणी सोनगाव ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी थेट सोनगावकडे जाणाऱ्या नाल्यात सोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त झालेल्या सोनगाव ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोटे औद्योगिक वसाहतीतील सहा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लोटे येथील सीईटीपी (कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट) पंपाकडे जाणाऱ्या सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एमआयडीसी प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाला ई-मेलद्वारे माहिती दिली होती. तसेच या कालावधीत संबंधित कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी पाइपलाइनमध्ये न सोडता टँकरद्वारे मुख्य सीईटीपीमध्ये पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, सोमवारी रात्री काही कंपन्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करून सांडपाणी थेट दुरुस्ती सुरू असलेल्या पाइपलाइनमध्ये सोडल्याचा आरोप आहे. त्यामुळे ते रासायनिक पाणी सोनगावकडे जाणाऱ्या नाल्यात मिसळले. मंगळवारी सकाळी नाल्यात पांढऱ्या रंगाचे रासायनिक पाणी दिसून आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर सुमारे १५० ते २०० ग्रामस्थांनी लोटे पोलीस चौकी गाठून संबंधित कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत लेखी तक्रार दिली. लोटे पोलिसांनी तत्काळ एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पोलीस चौकीत बोलावले. पोलीस चौकीत झालेल्या चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने सुप्रिया लाइफ सायन्सेस, विनती ऑरगॅनिक, स्पॅक, एसएमडी स्पेशालिटी, लक्ष्मी ऑरगॅनिक आणि एकविला ऑरगॅनिक या सहा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिशीची प्रत सोनगाव ग्रामपंचायतीलाही देण्यात आली. प्रदूषण मंडळाकडून तातडीने कारवाई करण्यात आल्याने आक्रमक झालेल्या सोनगाव व परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी राजू घाग, मिलिंद घोरपडे, शेखर मोरे, विष्णू साळुंखे, विष्णू घाग, योगेश घाग, विनायक घाग, दीपक घाग, प्रथमेश घाग, विनोद चाळके, रवी गोवळकर, सचिन चाळके, मंगेश चाळके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg