खेड (प्रतिनिधी) - सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी केबिनमध्ये बसून फक्त आदेश सोडण्यापेक्षा, स्वतः 'ऑन द फील्ड' उतरून परिस्थितीवर मात कशी केली जाते, याचा वस्तूपाठ पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घालून दिला आहे. त्यांच्या या थेट आणि तत्पर कामगिरीचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केबिनमध्ये बसून राहणे पसंत केले नाही. त्यांनी थेट पूरग्रस्त आणि संवेदनशील भागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. पाणी साचलेल्या ठिकाणी आणि नदीकाठच्या भागात स्वतः जाऊन त्यांनी मदतकार्याची आणि उपाययोजनांची पाहणी केली. त्यांच्या या 'अॅक्शन मोड'मुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस फौजफाटा अधिक वेगाने कामाला लागला.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात भीषण दरड कोसळण्याची घटना घडली. दरडीचा भलामोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने गजबजलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे बंद झाला होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता आणि परिस्थिती गंभीर बनली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्काळ कशेडी घाटाकडे धाव घेतली. केवळ सूचना न देता, त्यांनी स्वतः जागेवर थांबून ढिगारा उपसण्याच्या कामाचे नियोजन केले.
प्रशासकीय यंत्रणा, जेसीबी आणि मदतकार्य पथकांना सोबत घेऊन युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या थेट देखरेखीमुळे कामाला प्रचंड वेग आला आणि अखेर कशेडी घाटातील दरड अंशतः हटवून एकेरी वाहतूक यशस्वीरित्या सुरू करण्यात आली. यामुळे अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.