loader
Breaking News
Breaking News
Foto

पालपेणे फाटानजीकच्या चाळीमध्ये पाणी; मोरी बुजविल्याने आपत्ती, स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा रहिवाशांचा इशारा

वरवेली (गणेश किर्वे)- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी पालपेणे फाट्याजवळ गेली ६० वर्षे असलेल्या जुन्या चाळीसमोरुन जाणा-या नदिपात्रामध्ये व रस्त्यालगत अनधिकृत गाळे व भव्य इमारतीचे बांधकाम केल्याने संबंधित कंत्राटदाराने यावेळी मोरी बुजविली. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने चाळीच्या चारी बाजूने जाणारे गटाराचे पाणी नागरिकांच्या खोल्यांमध्ये शिरत आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या हे निदर्शनास आणून दिले असून अद्यापही मोरीचे बांधकाम झालेले नसल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, याबाबत कार्यवाही न झाल्यास स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा दिशारा रहिवाशांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाण्याचा निचरा होण्यासाठी व तेथील चाळीमध्ये राहत असलेल्या नागरिकांच्या जीवितेला धोका निर्माण होऊ नये म्हणून काही वर्षापूर्वी शासनामार्फत याठिकाणी मोर्‍या टाकण्यात आल्या होत्या मात्र इमारतीचे बांधकाम करत असताना कंत्राटदाराने मोरी बुजवून टाकल्यामुळे तेथील नागरिकांचा जीवितेस धोका निर्माण होत आहे. संबंधित बंद मोरीचे बांधकाम ०६ महिन्यांपूर्वी शासनाकडून मंजूर होऊन देखील संबंधित ठेकेदाराने हे काम अद्याप केलेले नाही. ज्यावेळी पाणी चाळीमध्ये घुसले त्यावेळी याची पाहणी उपसरपंच असीम साल्हे यांनी केली.

टाइम्स स्पेशल

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे काही वर्षापूर्वी संबंधित इमारत कंत्राटदाराने शासनाने टाकलेल्या मोरी बंद केल्याने सदर कंत्राटदार शासनाचे नुकसान व चुकीचे काम करत आहे हे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिले असतानादेखील ग्रा.पं.ने लक्ष दिलेले नाही. गेल्यावर्षी पावसाळयामध्ये घरांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे व यंदाही साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या आर्थिकदृष्ट्‌या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे येथील मोरीची दुरुस्ती न झाल्यास स्वातंत्र्यदिनी उपोषणाला बसण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg