खेड(प्रतिनिधी)- खेड तालुक्यातील सात्वीणगाव बौद्धवाडी येथे ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज महेंद्र मोहिते (वय ३५, रा. सात्वीणगाव बौद्धवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे १५ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करून घरी आले. त्यानंतर ते बडबड करत आपल्या खोलीत गेले, लाईट बंद करून आतून कडी लावून झोपले. सायंकाळी सुमारे ६ वाजता कुटुंबीय घरी परतले असता मनोज यांची बडबड सुरूच होती. रात्री सुमारे ७.४५ वाजता त्यांच्या मुलाकडे जाण्यासाठी सुनेने खोलीच्या दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता मनोज हे छतावरील लोखंडी बारला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
यानंतर कुटुंबीयांनी पडवीतून खोलीत प्रवेश करून दरवाजा उघडला. दोरी कापून त्यांना खाली उतरविण्यात आले आणि तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील डॉ. मुजावर यांनी १६ जुलै २०२६ रोजी पहाटे ४.१२ वाजता मनोज मोहिते यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील ओंकार नायनाक यांनी खेड पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.