loader
Breaking News
Breaking News
Foto

मळगाव इंग्लिश स्कूलच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना छत्रांचे वाटप

सावंतवाडी : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, या सामाजिक भावनेतून सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडीच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव शाळेच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात मिळत असून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी निवृत्त राजपत्रित अधिकारी शेखर पाडगावकर, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे खजिनदार भगवान रेडकर, मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे खजिनदार नंदकिशोर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले, सामाजिक कार्यकर्त्या रंजना तेली, सिद्धेश तेंडोलकर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान गेली दहा वर्षे सातत्याने शालेय वस्तू, छत्री वाटप तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संस्था करत असून सावंतवाडी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये संस्थेचे खजिनदार भगवान रेडकर यांच्या माध्यमातून छत्री वाटपाचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना कोणतीही अडचण येऊ नये, तसेच त्यांचे शिक्षण अखंड सुरू राहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेच्यावतीने सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg