loader
Breaking News
Breaking News
Foto

गोल्डमेडलिस्ट राम सारंग राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र जागृत नागरीक सेवा संस्था महाराष्ट्र आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राज्य व राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२६ नुकताच शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राम सारंग यांना हा पुरस्कार त्यांनी केलेल्या सामाजिक बांधिलकीचा, विविध क्षेत्रातील केलेल्या कार्यपध्दतीचा तसेच समाजहित, मानवता जनकल्याण समाजकार्य सास्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा व गुणवंत कामगार म्हणून केलेल्या कामाच्या कार्यपध्दतीचा आहे. म्हणूनच त्यांना हा राष्ट्रीय समाज भूषण म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे, असे उदगार खासदार शाहू महाराज यांनी काढले.

टाईम्स स्पेशल

राम सारंग यांना या पूर्वीही गोल्ड मेडल व अनेक विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांना या पुरस्काराने ही आणखीही पूढे जाण्यासाठी उर्जा मिळत आहे. समाजहिताचे अनेक उपक्रम राबवताना त्यांनी अनेक संस्थाचा उपयोग करुन घेतला. या विविध क्षेत्रातील संस्थेमधून त्यांनी स्वहित न बघता अनेक विद्यार्थी तसेच कार्यकर्ते घडवले व सर्वाना स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी मदतही केली आहे. त्यांचे चौरंगी कार्यच त्यांना हे पुरस्कार प्राप्त करून देत आहे. आणखी एक हा मानाचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg