केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील आसगे-तळवडे रोड धुंदरेपासून तळवडेपर्यंत रस्त्यालगत दुतर्फा वृक्ष लागवड करून झाडांना संरक्षण म्हणून लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी केलेली वृक्षलागवड पुर्णतः जमिनदोस्त झाली असल्याने लाखो रूपये पाण्यात गेल्यासारखे असल्याचे दिसून येत आहे. मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर रस्त्याच्या दुतर्फा आकेशिया झाडांची तोड झाल्याने जागा मोकळी झाल्यामुळे यावर्षी वड, पिंपळ अशा विविध झाडांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आली आहे.
अगदी चार दिवसांपूर्वी रस्त्यापासून तीन/चार फुट अंतरावर लागवड करण्यात आलेल्या झाडांना संरक्षण म्हणून लोखंडी जाळीही बसविण्यात आली आहे. यासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले असताना बहुतेक झाडे दोन दिवसातच आडवी पडली. यावरून निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे दिसून येत असून वृक्ष संवर्धन करायचे म्हणून करण्यात आले की काय ?असा सवाल उपस्थित केला जात आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडला असल्याने वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली असताना संबधित यंत्रणेकडून काळजीपूर्वक वृक्षसंवर्धन होताना दिसून येत नाही. कोणाची भिती राहिली नसून सरकारी पैशाची उधळपट्टी होत असल्याचे बोलले जात असुन चौकशीची मागणी केली जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.