loader
Breaking News
Breaking News
Foto

वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत टीबी मुक्त पंचायत २०२५ ने सन्मानित

रसायनी (राकेश खराडे) - राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीला टीबी मुक्त पंचायत २०२५ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ग्रामपंचायतीने क्षयरोग निर्मूलनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. पंचायत समिती सभागृह, खालापूर येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई संदिप मुंढे आणि ग्रामविकास अधिकारी वैभव बाळकृष्ण पाटील यांना गटविकास अधिकारी संदीप कराड, सभापती कृष्णा पारंगे आणि उपसभापती भाई शिंदे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे वासांबे ग्रामपंचायतीच्या आरोग्यविषयक जनजागृती, क्षयरोग प्रतिबंधक मोहिमा आणि गावाला टीबीमुक्त ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg