loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शासकीय विश्रामगृहाची संरक्षक भिंत कोसळली

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगडमध्ये सलग पाच दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंडणगड भिंगळोली येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील आवारासाठी उभारण्यात आलेली पक्की संरक्षक भिंत कोसळून शासकीय मालमत्तेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मंडणगड तालुक्यातील गावागावात अगदी सगळिकडेच अतिवृष्टीमुळे खाजगी मालमत्तांसह सरकारी मालमत्तांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्वच पडझडीच्या घटनांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून सुरू आहेत. पण अशा काही गोष्टी आहेत कि त्याची मोजदादही केली जात नाही. त्यात विदयुत महावितरण कंपनीचे पोल आडवे पडून झालेले नुकसान असेल, रस्ते वाहून जाण्याचे प्रकार असतील यांच्या मोजदादीपेक्षा लोकोपयोगी कामासाठी पूर्ववत कामांना प्राधान्य दिले जाते.

टाईम्स स्पेशल

त्यात आणखीन एका नुकसानीच्या घटनेची भर पडली आहे. ती म्हणजे मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणच्या अखत्यारितील शासकीय विश्रामगृह या विश्रामगृहाच्या परिसरातील आवाराच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg