दोडामार्ग- ’दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ (भारतीय बौद्ध महासभा) सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या अंतर्गत दोडामार्ग तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नवनियुक्त समितीचे अधिकृत नियुक्ती पत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. दोडामार्ग येथील सुधाकर कॉम्प्लेक्समध्ये आयोजित विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष आयु. आनंदकुमार विश्राम धामापूरकर, जिल्हा सचिव आयु. प्रवीण भिकाजी कदम आणि जिल्हा उपाध्यक्ष आयु. चंद्रकांत भोजू जाधव उपस्थित होते.
सोबतच विहार समन्वयक आयु. संजय रामा पाटील यांनीही या बैठकीला हजेरी लावली. ही नवनियुक्त कार्यकारिणी पुढील दोन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात घोषित करण्यात आली आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत पदाधिकार्यांच्या संघटनात्मक कार्याचा आणि सक्रियतेचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी या शाखेला अंतिम मान्यता दिली जाईल, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच कामात सक्रिय नसणार्या पदाधिकार्यांची पदे अंतिम मान्यता पत्रातून कमी केली जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे: अध्यक्ष आयु. दीपक बुधाजी जाधव (घोटगे), उपाध्यक्ष आयु. सीताराम तानाजी जाधव (बोडदे), सचिव आयु. हरिश्चंद्र रामा मणेरकर (मणेरी), कोषाध्यक्ष आयु. कृष्णा बाबी कदम (कुंब्रल)मुख्य संघटक आयु. विजय लाडू जाधव (कुडासे), संस्कार समन्वयक आयु. भगवान महादेव जाधव (उगाडे), सहसंघटक आयु. आनंद तामसो सम्राट (हेवाळे), सदस्य आयु. अस्मिता आनंद सम्राट (हेवाळे), सदस्य आयु. क्रांतीराज तामसो सम्राट (हेवाळे), सदस्य आयु. शंकर शांताराम जाधव (केर), सदस्य आयु. महेश मोहन जाधव (घोटगे) या नवीन निवडीबद्दल दोडामार्ग तालुक्यातील समाज बांधवांकडून नवनियुक्त पदाधिकार्यांचे जाहीर अभिनंदन केले जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.