loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड काँग्रेस कार्यालयात विशेष सभा संपन्न

खेड - खेड काँग्रेस कार्यालयात अजीमभाई सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केलेली होती. या सभेसाठी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अतिशय चांगल्या रितीने सभा पार पाडली. विविध विषयांवर चर्चा केली विशेषतः बीएलए-२ ची नेमणूक करण्यासाठी लागणारे फॉर्म व कागदपत्रे जमा करण्यात आली. तसेच मतदार यादीविषयी सखोल अभ्यास करुन येणाऱ्या अडी-अडचणी कशा सोडवाव्यात त्याचे मार्गदर्शन जिल्हा सेक्रेटरी फैसल देसाई यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रतिसाद चांगला लाभला. या सभेसाठी सिमा शिंदे (जाधव), जिल्हा सचिव, मुराद अली लाडघरकर, जिल्हाअध्यक्ष, अल्पसंख्याक सेल, चंद्रकांत मोरे, जिल्हाध्यक्ष, सेवा दल, मंगेश भैरवकर, खेड शहर अध्यक्ष, तौफीक पोत्रिक, उपाध्यक्ष, खेड, खलील पोफळणकर, उपाध्यक्ष, खेड, महमंद काझी, नाझिमा तांबे, कौसर मुजावर असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ही सभा चालू असताना सोनललक्ष्मी घाग, जिल्हाध्यक्ष व सुरेश कातकर अचानक भेट दिली.

टाईम्स स्पेशल

यावेळी जिल्हासेक्रेटरी फैसल देसाई, मुरादअली लाडघरकर, जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक सेल, चंद्रकांत मोरे, जिल्हाध्यक्ष, सेवा दल, सिमा शिंदे (जाधव), जिल्हा सचिव, तसेच पुन्हा तालुकाध्यक्ष झालेबद्दल अजिम सुर्वे यांचा जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान खेड काँग्रेस करत असलेले काम बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. तदनंतर प्रफुल्ल शेवरकर, तालुका जनरल सेक्रेटरी यांनी आभार व्यक्त केले आणि सभेची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg