loader
Breaking News
Breaking News
Foto

बदलापूरच्या 'आरजी’झ डान्स स्टुडिओ'चा जागतिक स्तरावर डंका

वरवेली (वार्ताहर) - बदलापूरच्या 'आरजी’झ डान्स स्टुडिओ'च्या विद्यार्थ्यांनी मलेशियातील क्वालालंपूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील डान्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे नाव जागतिक नकाशावर कोरले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बदलापूरच्या कलाकारांनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली आणि एकूण ५ सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावून देशाला अभिमान मिळवून दिला. रिधिमा मंचेकर: २ सुवर्ण पदके, जान्हवी विश्वदीप कदम २ सुवर्ण पदके, प्रणया चव्हाण १ सुवर्ण पदक, श्लोक गोखले १ रौप्य पदक, कोरिओग्राफर प्रथमेश नाईक यांच्यासाठी हा क्षण खूप खास होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आठ वर्षांपूर्वी, प्रथमेश स्वतः थायलंडमध्ये इंटरनेशनल डान्स स्पर्धेत सहभागी झाले होते. आज, त्याच मेहनतीच्या जोरावर त्यांनी थेट मलेशियातील या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 'जज' (परीक्षक) म्हणून काम पाहिले. ते तिथे स्वतः मुलांसोबत उपस्थित होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या जागतिक यशामागे कोरिओग्राफर प्रथमेश नाईक आणि विनय मगडे यांची जिद्द व कठोर परिश्रम आहेत. या संपूर्ण मोहिमेला आरजी’झ डान्स स्टुडिओचे डान्स डायरेक्टर रवी गावस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टाईम्स स्पेशल

या यशात पालकांचा वाटाही तितकाच मोलाचा आहे. विपाली कदम आणि दिपाली मंचेकर यांनी दिलेल्या समर्थनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यामुळेच ही आंतरराष्ट्रीय झेप घेणे शक्य झाले आहे. बदलापूरच्या या उदयोन्मुख कलाकारांनी जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करून शहराचा गौरव वाढवला आहे. त्याच प्रमाणे जान्हवी कदम व रिदिमा मंचेकर या आदर्श विद्यामंदिर इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थीनी असून नववीमद्ये शिकत आहेत, त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg