loader
Breaking News
Breaking News
Foto

दक्षिण प्रशांत महासागरात चीनच्या क्षेपणास्त्राची चाचणी, न्यूझिलंड आणि तायवानसह अनेक देशांनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली - दक्षिण प्रशांत महासागराच्या परमाणूमुक्त क्षेत्रामध्ये चीनने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूडिलंड आणि तायवान या देशाने या बाबत चिंता व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार चीनने अणुशक्तीचे महास्फोटक क्षेपणास्त्र चाचणी केल्याने दक्षिण प्रशांत महासागरात मोठी खळबळ उडाली आहे. चीनने सैन्यअभ्यास म्हणून हा प्रयोग केला आहे. चीनच्या परिक्षणानंतर दलाई लामा यांचे भाचे खेदरुब थोंडूप यांनी म्हटले आहे की, हा चीनचा अभ्यास नसून एक स्पष्टपणे राजकीय संदेश आहे. ज्या दिवशी ऑस्टे्रलिया आणि फिजी या देशांनी समझोता करारावर हस्ताक्षर केले. त्याच दिवशी चीनने हा स्फोट घडवून आणला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, क्षेपणास्त्र जेएल-३ जो अमेरिकेपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. यातून चीनने आपली शक्ती दाखविली आहे. क्षेपणास्त्र अशा क्षेत्रात पडले जिथे १९८६ च्या रारोपोंगा करार अंतर्गत दक्षिण प्रशांत महासागरात परमाणूमुक्त घोषित केलेला आहे. कोणताही देश अशा क्षेत्रामध्ये क्षेपणास्त्र परिक्षण करु शकत नाही. चीनने १९८७ मध्ये या करारावर हस्ताक्षर केले होते, तरीही प्रयोग केला आहे. जापानसह अनेक राष्ट्रांनी यावर आक्षेप घेतला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg