loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा महाविद्यालयातर्फे भात लावणी प्रात्यक्षिकाचे आयोजन

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील प्रा.आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय तर्फे दिनांक 6 जुलै 2026 रोजी भात लावणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पारंपरिक शेती संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद झेपले यांनी विद्यार्थ्यांना भात शेतीचे महत्व व आधुनिक पद्धती बरोबर पारंपरिक शेतीच्या मूल्यांची माहिती करून दिली. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी पूर्ये तर्फे देवळे येथिल शंकर वैद्य यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष पाणथळीत उतरून भात लावणी, रोप काढणी आणि ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी मौजमस्ती करून उत्साहात लावणी केली. महिलांप्रमाणे महाविद्यालयातील मुलींनीसुध्दा शेतामध्ये उत्तम काम करून शेतीच्या श्रम मुल्यांचा अनुभव घेतला.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. शिल्पा वैद्य यांनी केले. शेतकरी शंकर वैद्य यांनी आपल्या शेतामध्ये लावणीसाठी जागा उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती, पर्यावरण, श्रमसंस्कार याबाबत सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला. महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष प्रा. आबा सावंत व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg