loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांना वह्या वाटपाची मदत करणारे महेश चव्हाण यांच्या कार्याचे सर्वत्र होतेय कौतुक

खेड (प्रतिनिधी)- आजच्या काळात अनेक सस्था अनेक व्यक्ती विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढे सरसावतात. त्यातच कशेडी गावातील महेश चव्हाण यांनी देखील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांना वह्या वाटपाची मदत केल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज अशी माणसे समाजात दुर्मिळ होत चालली आहेत. खेड तालुक्यातील कशेडी येथील महेश मनोहर चव्हाण यांच्या वतीने कशेडी लिटी, कशेडी गावणकरवाडी, खवटी मंडलिक या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, कंपास, इतर वस्तूचा वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शैक्षणिक साहित्य वाटपादरम्यान विकास दरेकर, योगेश दरेकर, संकेत दरेकर, गणेश दरेकर सदर शाळेतील मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक उपस्थित होते. कशेडी गावणकर शाळा मुख्याध्यापक केशव नागरगोजे, मधुरा तांदळे, कशेडी लिटी शाळा मुख्याध्यापक सुनिल पांगुळ, उज्ज्वला पेडकर, खवटी मंडलिक शाळा मुख्याध्यापक अनिल भंडारी, चित्रा मणवल आदी उपस्थित होते. कशेडी येथील तिन्ही शाळा मिळून ४५ विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg