loader
Breaking News
Breaking News
Foto

सभापती प्रणव पोळेकर यांच्या गंभीर इशार्‍यानंतर खड्डे भरण्यास सुरवात

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यात विविध ठिकाणी भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही हे खड्डे अनेक दिवस तसेच उघडे राहिल्याने वाहनचालक व पादचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गंभीर परिस्थितीची दखल घेत पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना तात्काळ खड्डे न भरल्यास संबंधित अधिकार्‍यांनाच या खड्ड्यात उतरवण्याचा इशारा दिला होता. सभापती पोळेकर यांच्या या कडक भूमिकेनंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू करत रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत सभापती प्रणव पोळेकर यांनी वेळेत हस्तक्षेप केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच उर्वरित सर्व ठिकाणचे खड्डेही तातडीने भरून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg