loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम - शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब

सावंतवाडी, (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या १८ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. ​यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा ॲड. नीता कविटकर सावंत, शहराध्यक्ष नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार दीपक केसरकर यांचा १८ जुलै रोजी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश असेल. त्याअंतर्गत रक्तदाता संघटनेच्या वतीने नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिला संघटनेच्या वतीने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

याशिवाय मतदारसंघातील अंध बांधवांना मदत, छत्री वाटप, धान्य वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. आमदार दीपक केसरकर यांनी या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित राहावे, यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना आग्रह धरण्यात येईल, असेही संजू परब यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg