वरवेली (गणेश किर्वे) - स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध असल्याचे निवेदन देण्यासाठी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील महावितरण कार्यालयात गेलेल्या पाटपन्हाळे ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीचा शनिवारी हिरमोड झाला. यावेळी ग्रामस्थ कार्यालयात आलेले असताना निवेदन स्वीकारण्यासाठी जागेवर एकही अधिकारी नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. अखेर येथील उपस्थित महिला कर्मचाऱ्याकडे हे निवेदन सुपूर्द करत ग्रामस्थांनी आपला स्मार्ट मीटर बसविण्यास ठाम विरोध असल्याचे यावेळी जाहीर केले.
महावितरणचे कर्मचारी ग्राहकांच्या संमतीशिवाय किंवा कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये मीटर बसवत आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या अधिकारांवर गदा येत असल्याचा आरोप पाटपन्हाळे येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या तंटामुक्त समिती सभेत करण्यात आला होता. पाटपन्हाळे ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती यांचे संयुक्पणे निवेदन देण्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. गुहागर महावितरण उप अभियंता यांना कार्यालयात जाऊन निवेदन द्यावयाचे असल्याने तसे अधिकाऱ्यांना कळविण्यातही आले होते. मात्र, प्रत्यक्षात निवेदन देण्यासाठी ज्यावेळी ग्रामस्थ महावितरण कार्यालयात गेले त्यावेळी तेथेही कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते.
यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समिती यांनी संताप व्यक्त केला. तंटामुक्त समिती अध्यक्ष अजित बेलवलकर यांनी आपली स्मार्ट मीटर विरोधातील भूमिका स्पष्ट केली. आम्हाला मोर्चा काढावा लागेल वा आंदोलनाची वेळ आमच्यावर आणू नये असा इशारा महावितरण अधिकाऱ्यांना दिला. यावेळी सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, तंटामुक्त समितीचे सदस्य दिनेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, अँड. दिनेश कदम, गोरे, तुकाराम तेलगडे, संजय पवार, कस्तुरी पा गडे, चंदक्रांत तेलगडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.